CAA आणि NRC हे दोन्ही कायदे मुस्लिमांवर अन्याय करणारे


लेखक चेतन भगत यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून हल्ला केला आहे. चेतन भगत यांनी सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि NRC हे दोन्ही कायदे मुस्लिमांवर अन्याय करणारे असल्याची टीका केली आहे. विमानातील प्रवाशी आणि लाईफ जॅकेटचे उदाहरण देऊन चेतन भगत यांनी सरकारला आरसा दाखविण्याचाच प्रयत्न केला आहे.

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करत आंदोलन केले होते. पोलिसांनी यावेळी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटली. काही दिवसांपूर्वी लेखक चेतन भगत यांनीही यात गडगडणारी अर्थव्यवस्था. रोजगाराच्या कमी झालेल्या संधी. इंटरनेटवर बंदी. पोलिसांना वाचनालयामध्ये घुसवणे. तरुणांकडे संयम नक्कीच आहे. पण त्यांच्या संयमीची परीक्षा पाहू नका, असे ट्विट करून चेतन भगत यांनी सरकारवर टीका केली होती.


सुधारित नागरिकत्व कायदा आणि NRC दोन्ही कायद्यांवरून चेतन भगत यांनी पुन्हा मोदी सरकारला सुनावले आहे. सलग तीन ट्विट करून चेतन भगत यांनी हे दोन्ही कायदे कसे मुस्लिमांवर अन्याय करणारे असल्याचे सांगितले आहे. मुळात CAA ही समस्या नाही. पण CAA आणि NRC हे भेदभाव करणारे असल्यामुळे असे होऊ शकते, असे म्हणत एक उदाहरण देखील दिले आहे.


याचबरोबर चेतन भगत यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये विमानातील प्रवाशी आणि लाईफ जॅकेटचे उदाहरण देऊन हे कायदे चुकीचे असल्याचे मोदी सरकारला सुनावले आहे. CAA हे लाईफ जॅकेट आहे. तर भारतीय असल्याचे सिद्ध केल्यानंतर NRC हे सगळ्यांना विमानातून बाहेर ढकलणार आहे. पण, लाईफ जॅकेट मुस्लिमांना मिळालेलेच नाही. लाईफ जॅकेट वाटण्यात आले हा मुद्दा नाही. तर लाईफ जॅकेट मोजक्याच लोकांना देण्यात आले आणि सगळ्यांना विमानातून ढकलण्यात आले. हा मुद्दा असल्याचे म्हणत चेतन भगत यांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे. देशामधील तरुणाईला चिंता वाटेल अशा अनेक गोष्टी यापूर्वीही घडल्या आहेत. तरी तरुणाईचा संयम ठासाळलेला नाही. असे असले तरी या संयमाची परिक्षा घेतली जाऊ नये, अशी अपेक्षा ट्विट करून व्यक्त केली होती.

Leave a Comment