गुड न्युजचा दुसरा ट्रेलर तुमच्या भेटीला


अक्षय कुमार आणि करीना कपूर खान अभिनीत बहुप्रतिक्षीत ‘गुड न्यूज’ चित्रपटाचा दुसरा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज करुन निर्मात्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवली आहे.

चित्रपटात अक्षय-करिना आणि दिलजीत-कियारा हे जोडपे खूप चांगल आयुष्य जगत असतात. त्यांच्या जीवनात फक्त बाळाची कमतरता सतत जाणवत होती. दोन्ही जोडपे बाळाची इच्छा पूर्ण करण्यासाठी डॉक्टरकडे जाताना. विशेष म्हणजे चित्रपटात दोघांचे आडनाव हे बत्रा दाखवण्यात आले आहे. दोघांच्याही आयुष्यात या एकाच आडनावामुळे मोठी गोंधळ उडतो. ट्रेलरमध्ये हे ट्विस्ट सांगण्यात आले आहे. एकच आडनाव असल्यामुळे दोघांच्या वीर्याची अदलीबदली होते. त्यानंतर त्यानंतर जबरदस्त कॉमेडीला सुरूवात होते. ही कॉमेडी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मागील काही दिवसांपासून गुड न्यूजची गाणी तुमच्या भेटीला येत आहेत. त्याचबरोबर आता चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटांच्या गाण्याला सर्वाधिक पसंती मिळत असून सध्या पार्टीत याला जास्त लोकप्रियता मिळत आहे. चित्रपटात अक्षय कुमार आणि करीना कपूर खानसोबत दिलजीत दोसांझ आणि कियारा अडवाणी यांची देखील कॉमिक केमिस्ट्री आहे. याचा ट्रेलर अक्षय कुमारने पोस्ट केला आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने राज मेहता दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. हा चित्रपट 27 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

Leave a Comment