एकेकाळी कपड्याच्या दुकानात काम करणारा आज आहे दबंग 3 चा व्हिलेन

(Source)

अभिनेता किच्चा सुदीप दक्षिणेतील सुपरस्टार आहे. दक्षिणेत त्याला लाखो चाहते आहेत. त्याने एकापेक्षा एक सरस चित्रपटात काम केले आहे. आता तो सलमान खानचा आगामी चित्रपट दंबग 3 मध्ये एका नवीन अवतारात दिसणार आहे. या चित्रपटात किच्चा व्हिलेन म्हणून समोर येणार आहे.

किच्चा सुदीपचे वडिल हॉटेलचे मालक आहेत. मात्र सुदीपला हॉटेलमध्ये काम करायचे होते. मात्र त्याच्यासाठी इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.

(Source)

एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितले की, एकवेळ अशी होती जेव्हा खिशात केवळ 500 रुपये होते. स्ट्रलिंगच्या काळात त्याला महिन्याला केवळ 500 रुपये मिळत असे.

स्वतःच्या खर्चासाठी वडिलांकडून एकही रुपया न घेता कपड्याच्या दुकानात काम केले. फोटोशूट केले, क्रिकेट खेळला. याविषयी तो म्हणतो ही स्ट्रग्लिंगची वेळ होती, यातून खूप काही शिकलो.

(Source)

सुदीपला जेवण बनवण्याची देखील आवड आहे. तो आपल्या मित्रांसाठी, कुटूंबासाठी नेहमी आवडीने जेवण बनवतो.

(Source)

सुदीपने आपले करिअर चित्रपट ‘Thayavva’ केले होते. मात्र त्याला हुच्चा चित्रपटानंतर ओळख मिळाली. बॉलिवूडमध्ये देखील त्याने फूंक 2, रक्तचरित्र यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

 

Leave a Comment