जस्टिन बिबरचे लोकप्रिय गाणे गाणारा शेतकरी होत आहे व्हायरल

(Source)

गायक जस्टिन बिबरला त्याच्या ‘बेबी बेबी’ या गाण्यामुळे आजही ओळखले जाते. अनेक वर्षानंतर देखील आजही अनेकजण हे गाणे गुणगुणत असतात. अनेकांनी जस्टिन बिबरप्रमाणे हे गाणे गाण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येकालाच त्याच्याप्रमाणे गाणे शक्य झाले नाही. मात्र सध्या एका लुंगी व शर्ट घातलेल्या भारतीय व्यक्तीने गायलेले ‘बेबी’ हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कर्नाटकमधील चित्रदुर्गा जिल्ह्यातील हिरीयूर येथील 26 वर्षीय शेतकरी प्रदीप एचआर शेतात काम करताना चक्क जस्टिन बिबरचे बेबी हे गाणे गातो. केवळ तेच नाहीतर अनेक इंग्लिश गाणी देखील प्रदीपला सहज पाठ आहेत.

प्रदीप आपल्या गाण्यांद्वारे नेहमीच स्थानिकांचे मनोंरजन करतो. गावातील लोकांना गाणी तर समजत नाहीत, मात्र ते त्याचा भरपूर आनंद घेतात.

ग्रॅज्यूएशनमध्ये असताना प्रदीप इंग्रजीमध्ये नापास झाला. त्यामुळे ती भाषा शिकायचीच असा त्याने निश्चय केला. यातूनच इंग्लिश गाणी आणि वेस्टर्न म्यूझिकबद्दल त्याला आवड निर्माण झाली. तो केवळ इंग्लिशच नाही तर चाइनीज आणि जापनीझ गाणी देखील गातो.

तो सांगतो की, मला चाइनीज आणि जापनीझ भाषा समजत नाहीत. मात्र मी ही गाणी वारंवार ऐकतो व त्याप्रमाणे गाण्याचा प्रयत्न करतो. मी काहीही करत असताना कानात एअरफोन लावून गाणी ऐकत असतो.

Leave a Comment