भारतात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगला नागरीकांची यादी द्या


नवी दिल्ली – भारतात बेकायदेशीर वास्तव्यास असणाऱ्या आपल्या नागरीकांची यादी बांगलादेशने मागितली आहे. बेकायदेशीर रित्या वास्तव्याला असणाऱ्या आमच्या नागरीकांची यादी सुपूर्द करण्याची विनंती आम्ही भारताला केली आहे. रविवारी ही माहिती बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री एके अब्दुल मोमेन यांनी दिली. मागच्या आठवडयात व्यस्त वेळापत्रकाचे कारण देऊन अब्दुल मोमेन यांनी भारत दौरा रद्द केला होता.

त्यांना एनआरसी संबंधी विचारला असता त्यावर ते म्हणाले की, भारत-बांगलादेशचे संबंध खूप सामान्य आणि चांगले असून भारताचा एनआरसी हा अंतर्गत विषय आहे. दोन्ही देशांच्या संबंधांवर एनआरसीमुळे कुठलाही परिणाम होणार नाही असे आम्हाला भारताकडून आश्वासन मिळाले आहे. काही भारतीय सुद्धा आर्थिक कारणांमुळे मध्यस्थामार्फत बांगलादेशमध्ये बेकायदा प्रवेश करत असल्याचा त्यांनी दावा केला.

बांगलादेशमधील आमच्या नागरीकांव्यतिरिक्त अन्य कोणाचे बेकायदा वास्तव्य आढळून आल्यास त्यांना माघारी पाठवू, असे मोमेन म्हणाले. काही जण बांगलादेशमध्ये भारताला लागून असणाऱ्या सीमेवरुन प्रवेश करत असल्याचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता त्यांनी हे उत्तर दिले.

Leave a Comment