चित्रपटाच्या प्रमोशनासाठी लाच घेताना कपिल कॅमेऱ्यात कैद


तब्बल एक वर्ष सिनेसृष्टीपासून लांब राहिलेल्या कपिल शर्माने छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक केले आहे. त्याचा ‘द कपिल शर्मा शो’ हा एवढा हिट ठरला आहे की आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी मोठमोठे सेलिब्रिटी एकदा तरी त्याच्या कार्यक्रमात आवर्जुन हजेरी लावतात. कपिलच्या शोमध्ये नुकताच असाच एक सेलिब्रिटी येऊन गेला. हा सेलिब्रिटी होता बॉलीवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगण. अजयने पत्नी काजोलसह कपिलच्या शोमध्ये ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली. पण सध्या सोशल मीडियावर कपिलने चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अजयकडून लाच घेतल्याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.


कपिलने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. कपिल हा या व्हिडीओच्या सुरुवातीला अजयच्या चित्रपटाबद्दल बोलताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर मध्येच अजय देवगण येतो आणि त्याच्या खिशातून काही पैसे काढून कपिलच्या हातात ठेवतो. अजयने कमी रक्कम दिली म्हणून कपिल विचारताच, तो तिथून निघून जातो. कपिलने याला सगळीकडे भ्रष्टाचार असल्याचे कॅप्शन देत व्हिडीओ पोस्ट केला आहे. पण हा सगळा कपिलच्या थट्टेचा भाग असल्यामुळे व्हिडीओच्या कमेंटमध्ये नेटकऱ्यांनी खळखळून हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत.

Leave a Comment