थंडीत आजारांना दूर ठेवण्यासाठी आहारात करा या 10 गोष्टींचा समावेश

(Source)

हिवाळ्यात सर्दी, ताप, खोकला होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी आपले शरीर गरम ठेवणे हे एक आव्हानच असते. 10 डिग्री सेल्सियसपर्यंतच्या तापमानामुळे थंडी देखील वाढली आहे. या थंडीच्या दिवसात कोणत्या गोष्टींचे सेव केले पाहिजे हे जाणून घेऊया.

(Source)

आवळा –

विटामिन सी युक्त आवळा यकृत, पचन, त्वचा आणि केसांसाठी चांगले समजले जाते. असिडिटी, ब्लड शुगर आणि कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात करणारा आवळा थंडीत शरीराला गरम ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.

(Source)

मध –

थंडीत सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी मध फायदेशीर आहे. तुमची इम्युनिटी सिस्टम चांगली ठेवण्यासाठी हे मदत करते.

(Source)

बदाम –

विटामिन आणि अँटीऑक्सीडेंट्सने युक्त बदाम थंडीत एक चांगला डाईट आहे. दूध अथवा मधाबरोबर याचे सेवन केल्याने थंडीपासून बचाव होईल. अनेक घरात चिक्की अथवा लाडूमध्ये देखील याचा वापर केला जातो.

(Source)

संत्री –

संत्र्यात विटामिन सी मोठ्या प्रमाणात असते. थंडीत आपल्या त्वचेला नुकसान होत असते. ज्याची भरपाई संत्रे करते.

(Source)

आले –

औषधीय गुण असलेले आले शरीराला फायदे पोहचवणाऱ्या अनेक अँटीऑक्सीडेंट्समध्ये आढळते. ताप, एसिडिटी, सर्दी आणि खराब पाचनतंत्रामध्ये आल्याचा चहा चांगला उपाय आहे.

(Source)

तूप-

सध्या अनेकजण डाइटचे कारण देऊन तूप खाणे टाळतात. जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर तूप थंडीत तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरेल.

(Source)

अंडी –

अंड्याला प्रोटीनचा राजा म्हटले जाते. यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि विटामिन आहे. ज्यामुळे थंडीत शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी फायदा होतो.

(Source)

लसूण –

थंडीत शरीराचा रक्तप्रवास संथ असतो. याला नियंत्रणात ठेवण्यासाठी लसणाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

(Source)

तुळस –

विटामिन ए, विटामिन सी, कॅल्शियम, जिंक आणि आयरन युक्त तुळस थंडीत व्हायरल इंफेक्शनपासून बचाव करते. सकाळ-संध्याकाळ तुळस टाकून चहा घेतल्यानं थंडीत तुमच्या आजुबाजूला देखील येणार नाही.

(Source)

काळी मिरी –

काळी मिरीचा वापर प्रत्येक घरात होतो. खाण्यातील याचा वापर केवळ स्वादच वाढवत नाही तर शरीराला देखील गर्म ठेवतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment