‘तान्हाजी’मध्ये ही अभिनेत्री साकारणार सोयराबाईंची भूमिका


गेल्या काही वर्षांमध्ये सिनेसृष्टीत अनेक नव्या चेहऱ्यांनी प्रवेश केला असून त्यामध्ये काही स्टारकिड्सचा देखील समावेश आहे. त्यातील काहींनी आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत आपले स्थान भक्कम केले आहे. त्यात आता आणखी एका अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे.


अजय देवगणच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातून इलाक्षी गुप्ता पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.


‘तान्हाजी’ हा बोल्ड मॉडेल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या इलाक्षीचा पहिलाच चित्रपट असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची सोयराबाई मोहिते यांची भूमिका ती यात साकारणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांची व्यक्तीरेखा मराठी अभिनेता शरद केळकर साकारत आहे. त्याचबरोबर तान्हाजीनंतर ती लवकरच मराठी चिपटात पदार्पण करणार आहे.


तान्हाजी चित्रपटाआधी इलाक्षीने प्रदीप सरकार दिग्दर्शित ‘कोल्ड लस्सी आणि चिकन मसाला’ या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. २०१५ साली ‘मिसेस इंडिया ग्लोब’ हा खिताब इलाक्षीने मिळवली होता.

Leave a Comment