भारताच्या शिफारशीमुळे आता 21 मे आंतरराष्ट्रीय चहा दिवस


नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र महासभेने भारताच्या शिफारसीमुळे 21 मेला आंतरराष्ट्रीय चहा दिवस घोषित केला आहे. 4 वर्षांपूर्वी मिलान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय खाद्य आणि कृषी संघटना (एफएओ) च्या अंतर सरकारी समूहाच्या बैठकीमध्ये भारताने हा प्रस्ताव सादर केला होता. सध्या चहा उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये दरवर्षी 15 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जातो. भारताच्या पुढाकारामुळे यापूर्वी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून निवडला गेला होता.

आपल्या अधिसूचनेमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने म्हटले आहे, ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये चहाच्या योगदानाबद्दल आम्ही लोकांना जागरूक करू इच्छितो, जेणेकरून 2030 च्या विकासाशी निगडित लक्ष्य पूर्ण केले जाऊ शकते. संयुक्त राष्ट्राला विश्वास आहे 21 मेला आंतरराष्ट्रीय चहा दिवस घोषित केल्यामुळे उत्पादन आणि खप वाढीस मदत मिळेल. ग्रामीण क्षेत्रामध्ये जे भूक आणि गरीबीसोबत लढण्यासाठी फायदेशीर ठरेल. चहाच्या औषधी गुणांसोबत सांस्कृतिक महत्वाला देखील संयुक्त राष्ट्र महासभेने मान्यता दिली आहे.

सर्व सदस्य देश, आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटनांना संयुक्त राष्ट्राने अपील केली आहे की, दरवर्षी 21 मेला त्यांनी आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा करावा. यामध्ये असे कार्यक्रम केले जावे, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत बनवण्यात चहाचे महत्व समजावले जावे. आता चहा उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये दरवर्षी 15 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जातो. भारत, नेपाळ, बांग्लादेश, इंडोनेशिया, श्रीलंका, तंजानियाव्यतिरिक्त अनेक देश यामध्ये सामील आहेत. पण याची सुरुवात एका एनजीओने केली होती. यासाठी मे महिना निवडला गेला. कारण चहा उत्पादनासाठी हा महिना सर्वात उत्तम मानला जातो.

Leave a Comment