उत्तर प्रदेशात उन्नावची पुनर्रावृती; बलात्कार पीडितेला जिवंत जाळले


उन्नाव – उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेला जिवंत जाळल्याची घटना ताजी असतानाच त्याच घटनेची पुनर्रावृती उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. फतेहपूरमध्ये बलात्कार पीडित तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पीडित तरुणी यामध्ये गंभीररित्या भाजली असून रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी फतेहपूरच्या हुसेनगंज भागामध्ये शेजारी राहणाऱ्या काकाने पीडित तरुणीवर बलात्कार केला. पीडित तरुणीला घेऊन तिचे कुटुंबिय शनिवारी सकाळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जात असताना आरोपीने त्याचवेळी पीडित तरुणीच्या अंगावर तेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

पीडित तरुणी या घटनेमध्ये ९० टक्के भाजली असून तिला कानपूर येथील खासगी रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले. पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे फतेहपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Comment