देशातील सर्वात तरूण आयपीएस अधिकारी लवकरच स्विकारणार पदभार

(Source)

भारतातील सर्वात तरूण आयपीएस अधिकारी असलेला 22 वर्षीय हसन सफीन लवकरच गुजरातमधील जामनगर येथे आपले पद सांभाळणार आहे. 23 डिसेंबरला हसन जामनगर येथे सहायक पोलीस अधिक्षक म्हणून पदभार स्विकारेल.

गुजरातमधील पालपूर येथील कोनादार या छोट्याशा गावातून येऊन हसनने आपली देशसेवा करण्याचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. मागील वर्षी हसनने यूपीएससी परिक्षेत 570 वी रँक मिळवली होती. त्याला आयएएस बनयाचे होते. मात्र तो आयपीएससाठी उत्तीर्ण झाला.

हसन सफीन याविषयी म्हणाला की, पुन्हा परिक्षा दिली मात्र त्यात मला यश मिळाले नाही. म्हणून मी आयपीएस म्हणूनच देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला.

हसनचे आई-वडिल मुस्तफा हसन आणि नसीमबानू हे दोघेही छोट्याशा युनिटमध्ये डायमंड वर्कर आहेत. सफीनला शिक्षणात अनेक अडचणी आल्या. आई-वडिलांच्या पगारात घरचा खर्च देखील भागत नसे. मात्र मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडू नये म्हणून आई नसीमबानू यांनी स्थानिक हॉटेल आणि लग्नाच्या हॉलमध्ये चपाती बनवण्याचे काम देखील केले.

Leave a Comment