पासपोर्टवरील ‘कमळा’च्या चिन्हाबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिले हे कारण

(Source)

आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यासोबतच एक महत्त्वाचे कागदपत्र म्हणून पासपोर्ट गरजेचा असतो. आता भारतीय पासपोर्टवर कमळाचे चिन्ह दिसणार आहे. यावरून विरोधी पक्षाने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कमळ हे भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. त्यामुळे या मुद्यावरून मोठा वाद सुरू झाला आहे.

विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, हे पाऊल बनवाट पासपोर्टची ओळख आणि सुरक्षेचा विचार करून उचलण्यात आलेले आहे. पुढे पासपोर्टवर दुसरे राष्ट्रीय प्रतीक छापण्यात येईल.

काँग्रेस नेते एमके राघवन यांनी केरळमधील कोझिकोड येथे वाटण्यात आलेल्या पासपोर्टवर कमळाचे चिन्ह असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. भाजपच्या निवडणूक चिन्हाचा वापर करून सरकारी संस्थांचे भगवेकरण करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार या मुद्यावर स्पष्टीकरण देताना म्हणाले की, हे चिन्ह आपले राष्ट्रीय फूल आहे व बनावट पासपोर्ट ओळखण्यासाठी वापरण्यात आलेले सिक्युरिटी फीचर आहे. हे सिक्युरिटी फीचर आंतरराष्ट्रीय नागरिक उड्डाण संघटनेच्या नियमावलीचाच एक भाग आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, कमळाव्यतरिक्त इतर राष्ट्रीय प्रतिके देखील छापली जातील. सध्या कमळ आहे, तर पुढील महिन्यात दुसरे काहीतरी असेल. ही चिन्ह भारताशी संबंधित असतील, जसे की राष्ट्रीय फूल किंवा राष्ट्रीय प्राणी असे असेल.

 

Leave a Comment