या अनोख्या शर्यतीत हॅमिल्टनने चालवली बाईक, तर रोसीने कार

(Source)

स्पेनच्या वेलेंसिया शहरातील रेसिंग सर्किट रिकार्डो टोर्मो येथे गुरूवारी एक खास रेस पाहण्यास मिळाली. या रेसमध्ये दोन दिग्गज सहभागी झाले होते. यामध्ये सहा वेळा फॉर्म्यूला 1 वर्ल्ड चॅम्पियन लुईस हॅमिल्टन आणि 9 वेळा मोटा जीपी वर्ल्ड चॅम्पियन असलेले वँलिंटिनो रोसी एकमेकांसमोर होते.

या रेसची खास गोष्ट म्हणजे लुई हॅमिल्टनने कार ऐवजी बाईक चालवली तर रोसीने बाईक ऐवजी रेसिंग कार हातात घेतली. हॅमिल्टनने रोसीला त्याची मर्सिडीज एमएमजी कार चालवण्यास दिली.

याच कारने हॅमिल्टनने 2017 मध्ये एफ-1 वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये विजय मिळवला होता. तर रोसीने त्याची यामाहा वाईझेडआर बाईक हॅमिल्टनला दिली. सध्या रोसी स्पर्धेमध्ये याच बाईकचा वापर करतो. ही एक मैत्रीपुर्ण रेस होती.

Leave a Comment