‘तान्हाजी’चे नवे गाणे तुमच्या भेटीला


काही दिवसांपूर्वी ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या बहुचर्चित ठरलेल्या चित्रपटातील ‘शंकरा रे शंकरा’ हे गाणे रिलीज केल्यानंतर या चित्रपटातील दुसरे गाणे आता रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे ‘माय भवानी’ असे बोल असून यात अभिनेता अजय देवगण आणि काजोलने ठेका धरला आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची कथा मोठ्या पडद्यावर भव्यदिव्य स्वरुपात पाहायला मिळणार आहे. अजय देवगण यामध्ये तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे. तर सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहे. भवानी मातेचे महात्म्य या गाण्यामध्ये सांगितले असून तिचे कौतुक केले आहे. तसेच तान्हाजी,त्यांच्या पत्नी आणि सारेच मावळे देवीच्या स्तुतीमध्ये रंगून गेल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या गाण्यात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेची देखील झळकला आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल, शरद केळकर, जगपती बाबू, पंकज त्रिपाठी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पुढच्या वर्षी १० जानेवारी रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment