आता वाहतुकीचे नियम तोडल्यास खात्यातून आपोआप कापले जाणार पैसे

(Source)

15 डिसेंबरपासून देशभरातील राष्ट्रीय महामार्गावर फास्टॅग RFID सिस्टम लागू होणार आहे. सर्व वाहनांवर फास्टॅग लावणे गरजेचे आहे. सरकारने हे पाऊल टोल नाक्यावर लागणाऱ्या लांबच लांब रांगामुळे उचलले आहे. मात्र आता सरकार पार्किंगसाठी देखील फास्टॅग अनिवार्य करणार आहे.

रस्ते, परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने हैदराबाद विमानतळावर एक पायलेट प्रोजेक्ट सुरू केला आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत हैदराबाद विमानतळावरील पार्किंगचे शुल्क फास्टॅगद्वारे घेतले जाईल. या प्रोजेक्टला दोन टप्प्यात सुरू केले जाईल. पहिल्या टप्प्यात केवळ आयसीआयसीआय बॅकद्वारे जारी करण्यात आलेले फास्टॅगद्वारेच शुल्क घेतले जाईल.

वृत्तसंस्था पीटीआयनुसार, दुसऱ्या टप्प्यात हैदराबाद विमानतळावर सर्व बँकेकडून जारी करण्यात आलेल्या फास्टॅगद्वारे शुल्क वसूल केले जाईल. मंत्रालयाचे म्हणणे आहे की, टोलशिवाय फास्टॅगचा वापर अधिक व्यापार स्तरावर करण्यात येईल. सरकारने याला फास्टॅग 2.0 असे नाव दिले आहे. यामध्ये पार्किंगचे शुल्क, पेट्रोल-डिझेलची खरेदी केली जावू शकते.

हैदराबादनंतर दिल्ली विमानतळावर देखील ही योजना सुरू करण्यात येईल. एसबीआय, एक्सिस, एचडीएफसी आणि आयडीएफसी मुंबई, बंगळुरू विमानतळाविषयी चर्चा सुरू आहे. काही मॉल्समध्ये देखील फास्टॅगची सुरूवात केली जाईल.

सरकारची योजना आहे की, फास्टॅग 2.0 द्वारे पेट्रोल-डिझेलशिवाय ई-चलान देखील फास्टॅगद्वारे भरावे लागेल. म्हणजेच जर तुम्ही वाहतूकीचे नियम तोडले तर फास्टॅगमधूनच तुमचे चलान कापले जातील.

याशिवाय फास्टॅगद्वारे मोटर विमा, मॉल्सची पार्किंग आणि चित्रपट बुकिंग देखील करता येईल. आरबीआयने देखील फास्टॅगद्वारे पार्किंग आणि पेट्रोल-डिझेलची खरेदी करण्यास परवानगी दिली आहे. आरबीआयच्या नॉटिफिकेशननुसार, कार्ड्स, यूपीआय, नॉन बँकिंग प्रीपेड पेमेंट इंस्ट्रूमेंटला नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कनेक्शनशी जोडले जाईल. आयडीएफसी बँक देशातील पहिली संस्था आहे, ज्याला आरबीआयने पंपावर फास्टॅगद्वारे इंधन भरता येईल.

 

Leave a Comment