विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर विनायक मेटेंनी ठोकला दावा


बीड : शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी भाजप आणि घटकपक्ष यांच्या आमदारांत सर्वात ज्येष्ठ मीच आहेच त्याचबरोबर अनुभवीसुद्धा मीच असल्यामुळे माझाच विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर अधिकार असल्याचे वक्तव्य केले आहे. आता भाजपच्या अडचणीत विनायक मेटे यांच्या दाव्याने वाढ होणार आहे.

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांसारख्या पक्ष श्रेष्ठींचा विधानपरिषद विरोधीपक्षनेतेपदाबद्दल बोलायचे झाल्यास हा सर्वस्वी निर्णय आहे. पण एक बाब निश्चितपणे सांगतो, भाजप आणि घटकपक्ष यांच्या आमदारांत विधानपरिषदेत सर्वात जेष्ठ मीच आहे. अनुभवी मीच आहे. त्या अर्थाने विरोधी पक्षनेतेपदावर माझाच अधिकार असल्याचे म्हणते हा सर्वस्वी निर्णय भाजपच्या पक्ष श्रेष्ठीचा असल्याचा दावा विनायक मेटे यांनी केला आहे.

तसेचं आम्ही विरोधीपक्षामध्ये राहून सकारात्मक विरोधीपक्षाचे काम आम्ही करु. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थापन झाले आहे. हे सरकार आता काय निर्णय घेते?, लोकोपयोगी काय निर्णय घेतात की नाही?, शेतकरी, महिला यांच्यासाठी काय निर्णय घेतला जातो? हे आम्ही पाहू. जर समजा या सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केली नाही तर, आम्ही विरोधाचे काम चोखपणे बजावण्याचे काम करु असे मते विनायक मेटे यांनी व्यक्त केले आहे.

आम्ही राज्यात महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापने नंतर विरोधी पक्षात आहोत. आम्ही ते काम चोखपणे बजावणार आहोत यासाठी शिवसंग्रामच्या सर्व आमदारांना घेवून मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजाच्या समाधीचे दर्शन घेणार आहे. तसेच चवदार तळ्यावर जावून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडून प्रेरणा घेवून संघर्षाला सुरुवात करणार असल्याचे आमदार विनायक मेटे यांनी सांगितले.

Leave a Comment