माही धोनी टीव्हीवर सांगणार वीरांच्या शौर्य गाथा


टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी सध्या क्रिकेट मैदानापासून दूर आहे आणि एका कार्यक्रमात बोलताना त्याने जानेवारी मध्ये तो पुन्हा क्रिकेट मैदानावर दिसेल असे सांगितले आहे. दरम्यान धोनी सध्या एका टीव्ही सिरीयलच्या तयारीत आहे. या सिरीयल मध्ये तो भारतीय शूर सैनिकांच्या शौर्य कथा सांगणार आहे. स्टुडीओ नेक्स्ट या सिरीयलची निर्मिती करत असल्याचे समजते.

यात देशातील सन्माननीय परमवीरचक्र, महावीरचक्र, अशोकचक्र पुरस्कार विजेत्या सैनिकांच्या कथा धोनी सांगणार आहे. या शूरवीरांची बहादुरी, त्यांचे साहस, शौर्य यासह वैयक्तिक आयुष्य याबद्दल कहाणी सांगितली जाणार आहे. प्राणांची पर्वा न करता देशसेवा करणाऱ्या जवानांना प्रकाशात आणण्यासाठी ही सिरीयल तयार केली जात आहे. धोनी स्वतः टेरेटोरिअल आर्मीच्या पॅराशूट रेजिमेंट मध्ये लेफ्टनंट कर्नल हुद्द्यावर असून त्याने आर्मीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

Leave a Comment