बिहार बक्सर जेलला १० फाशी दोर बनविण्याचे आदेश


भारतात मृत्युदंडाची शिक्षा गुन्हेगाराला फाशी देऊन पूर्ण केली जाते. अर्थात जेव्हा ही शिक्षा अमलात आणायची असेल तेव्हा त्यासाठी फाशीचे दोर बनविले जातात. हे दोर बनविण्याचे काम बिहारच्या बक्सर या एकमेव तुरुंगात केले जाते. या आठवड्यात या जेल कडे असे १० दोर बनविण्याचे आदेश आले असल्याचे तुरुंग अधिकारी विजय कुमार अरोडा यांनी सांगितले. मात्र या फाशी दोराचा वापर कुठे होणार आहे याविषयी काहीही माहिती नसल्याचा खुलासा त्यांनी केला.

अरोडा यांनी सोमवारी या संदर्भात माहिती देताना आत्तापर्यंत ४ -५ दोर तयार झाले असल्याचे सांगितले. हे दोर तुरुंगातील कैदीच बनवितात आणि या काळात त्यांच्यावर कडक पहारा असतो असे सांगून अरोडा म्हणाले, फाशीचे दोर बनविण्यासाठी देशात हा तुरुंग प्रसिद्ध आहे. संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरु याला फाशी देण्यासाठी वापरण्यात आलेला दोर येथेच बनविला गेला होता.


हे दोर बनविण्यासाठी खास धागा वापरला जातो. फाशीचे दोर बनविण्याचा इतिहास खूप जुना आहे. या साठी जी दोरी वापरली जाते तिचा दर गेल्या वेळी १७२५ रुपये होता तो महागाईमुळे यंदा वाढला आहे. ७२०० कच्च्या धाग्यातून एक दोर बनविला जातो आणि तो तयार करण्यासाठी ३ ते चार दिवस लागतात. त्यासाठी बहुतेक काम हाताने केले जाते तर थोडा यंत्र वापर केला जातो. हा दोर अतिशय मुलायम असतो आणि त्याची वजन पेलण्याची क्षमता १५० किलो असते.

सध्या बनविले जात असलेले फाशी दोर दिल्लीच्या निर्भया हत्याकांडातील आरोपींसाठी वापरले जातील असा कयास व्यक्त केला जात आहे. या गुहेगाराना या महिना अखेर फाशी दिली जाईल अशी चर्चा आहे.

Leave a Comment