तब्बल 85 लाखांचे एक केळे खाणाऱ्या व्यक्तीविरोधात दाखल झाली तक्रार


मियामी : तब्बल 85 लाख रुपयांमध्ये अमेरिकेमध्ये मियामीतील एका आर्ट गॅलरीमध्ये डक्ट टेप चिटकवलेल्या केळीचे आर्ट विकले गेले. या प्रदर्शना दरम्यान रविवारी अमेरिकेचा आर्टिस्ट डेव्हिड डाटुनाने भिंतीवरून काढून खाऊन टाकले. गॅलरीच्या डायरेक्टर लूसियन टेरेसने असे केल्यामुळे त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

या घटनेच्या 15 मिनिटानंतर एक नवी केळे आणून तिथे लावण्यात आले. इटलीचा आर्टिस्ट मॉंरिजियोने ही कलाकृती बनवली होती. त्याने अद्याप अशा तीन कलाकृती बनवल्या आहेत. यातील दोन विकल्या गेल्या आहेत. शेवटची विकण्यासाठी ठेवली गेली आहे. आता याचे फोटो व्हायरल होत आहेत.

मियामीच्या एका ग्रोसरी स्‍टोअरमधून या कलाकृतीमध्ये वापरली गेलेली केळी खरेदी केली होती. यामध्ये डक्‍ट टेपचा एक तुकडादेखील लावला गेला आहे. यासोबत याच्या विश्वसनीयतेचे एक सर्टिफिकेटदेखील आहे. पण हे सांगितले गेलेले नाही की, केळी किती दिवसानंतर साडू लागेल. पॅरोटिन गॅलरीचा मालक इमॅनुअल पॅरोटिनने मीडियाला सांगितले, केळी वैश्विक व्यापार आणि ह्यूमरचे प्रतीक आहे. “कॉमेडियन” असे याला नाव दिले गेले आहे. मॉंरिजियो कॅटेलन तोच कलाकार आहे, ज्याने बनवलेले सोन्याचे टॉयलेट (18 कॅरेट) काही दिवसांपूर्वी खूप चर्चेत होते.

Leave a Comment