यूरोपमध्ये प्रवेश देण्यासाठी युवकाने बनवली खोटी सीमारेषा, पोलिसांनी केली अटक

रशियाच्या अधिकाऱ्यांनी फिनलँड जवळ यूरोपीय संघाची बनावट सीमा बनवल्याच्या आरोपाखाली एका युवकाला अटक केली आहे. या युवकावर आरोप आहे की, तो या नकली सीमेवरून हजारो लोकांना यूरोप जाण्यासाठी चिथवण्याचा प्रयत्न करत होता. यासाठी दक्षिण कोरियाच्या 4 नागरिकांकडून त्याने 8,438 पाउंड (जवळपास 8 लाख रुपये) पेक्षा अधिक रक्कम देखील घेतली होती.

या युवकाने यूरोपमध्ये चांगले आयुष्य आणि काम देण्याचे एका समूहाला वचन दिले होते. याचबरोबर फिनलँडच्या मार्गाने यूरोपमध्ये पाठवणार असल्याचे म्हटले होते. या युवकाने स्कँडेनिवियन बोर्डरजवळ रशियात खोट्या सीमा चौकी बनवली होती.

पोलिसांनुसार, दक्षिण कोरियाचे चारही नागरिक आणि आरोपी युवक व्यबोर्ग शहरातून सीमा पार करत होते. याचवेळी त्यांना पकडण्यात आले. या प्रकरणात व्यबोर्ग जिल्हा न्यायालयाने चारही प्रवाशांना दंड घेऊन सोडून दिले आहे. या नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले की नाही याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

Leave a Comment