ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी आरबीआयने घेतला मोठा निर्णय

ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयने म्हटले आहे की, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफर (एनईएफटी) अंतर्गत व्यवहाराची सुविधा सुट्टीच्या दिवसासह आठवड्याच्या सातही दिवस सुरू राहिल. याचाच अर्थ की, तुम्ही कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी एनईएफटीद्वारे पैशांचे व्यवहार करू शकता.

आरबीआयने एका नॉटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की, एनईएफटी व्यवहार 24 तास, सातही दिवस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्व बँकांना योग्य पद्धतीने ही सेवा लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. 16 डिसेंबरपासून ही सेवा सुरू होईल.

सध्या एनईएफटीद्वारे 2 लाखांपर्यंतची रक्कम ऑनलाईन ट्रांसफर करता येते. हे ट्रँझेक्शन इंटरनेट अथवा मोबाईल बँकिंगद्वारे करता येते. सध्या सर्वसामान्य दिवशी एनईएफटी व्यवहार सकाळी 8 ते सांयकाळी 7 वाजेपर्यंत करता येतात. तसेच पहिल्या व तिसऱ्या शनिवारी हे व्यवहार सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत करता येतात.

Leave a Comment