गुजरातच्या वडोदरा येथील विमानतळ प्रशासनाने एक खास ऑफर आणली आहे. विमानतळावरील कबूतर पकडणाऱ्याला विमानतळ प्रशासन चक्क पैसे देणार आहे. एक कबूतर पकडण्यासाठी तुम्हाला 1 हजार रुपये मिळतील. विमानतळा इमारतीच्या 25 मीटर उंचीवर 16 कबूतरांनी स्वतःचे घर थाटले आहे. विमानतळ अधिकारी याला वैतागले आहेत.
या विमानतळावर मिळत आहे एक कबूतर पकडल्यास 1000 रुपये
कबूतर स्वच्छता आणि सुरक्षा अशा दोन्ही गोष्टीत त्रासदायक ठरत आहेत. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने नागरिकांना या कबतूरांना पकडण्याचे आवाहन केले आहे. विमानतळ संचालक चरण सिंह म्हणाले की, आम्ही कबूतरांना मारण्यावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी योग्य पर्याय शोधत आहोत.
