चर्चेचा विषय बनला युएसबी काँडोम


मुंबई : काँडोम नावाचा उच्चार केला की आपल्या समोर अनिश्चित धोका असेच चित्र उभे राहते. पण हा धोका आपल्याला शारिरीक संबंधातून नव्हे तर तो आपल्याला दररोजच्या वापरातही मिळू शकतो. याचमुळे सध्या सोशल मीडियावर युएसबी काँडोम (USB Condom) चर्चेचा विषय बनला आहे. जगभरात गेल्या काही दिवसांपासून युएसबी काँडोम चांगलाच लोकप्रिय होत आहे.

यामागे कारण देखील तसेच आहे. सध्याच्या घडीला आपण मोबाईल चार्ज करण्यासाठी युएसबी पोर्टचा वापर करतो. पण याच युएसबी पोर्टद्वारे होणारा धोका टाळण्यासाठी युएसबी काँडोमचा वापर करणे अतिशय महत्वाचे ठरणार आहे. या डिव्हाईसकडे युएसबी काँडोम अथवा युएसबी ब्लॉकर म्हणून देखील पाहिले जाते.

मोबाईल किंवा टॅबलेट इलेक्ट्रिसिटी म्हणजे चार्जिंग करण्यासाठी ज्यावेळी तुम्ही वापरता तेव्हा तुमच्या उपकरणातील डाटा ट्रान्सफर ही सिस्टीम युएसबी काँडोम करून टाकतो. त्यामुळे तुमच्या मोबाईलमधील अतिशय महत्वाच्या गोष्टी चोरी होण्यापासून रोखणार आहेत.

या डिव्हाईची किंमत जवळपास 500 रुपयांपर्यंत असणार आहे. यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय म्हणजे PortaPow USB data blocker. तुमचा मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर हे उपकरण फक्त चार्जिंगच काम करणार आहे. त्यामधून इतर कोणत्याही गोष्टींची चोरी होणार नाही.

मोबाइल अनेकदा चार्जिंगला लावताना युएसबी वापरल्यास तुमच्या मोबाईलमधील अत्यंत महत्वाचे पासवर्ड, महत्वाचे अॅप चोरी होण्यापासून रोखले जाणार आहे. युएसबी चार्जिंग स्कॅमपासून स्वतःचा मोबाईल वाचवण्यासाठी याची मागणी वाढत आहे. मध्यंतरीच्या काळात ज्युस जॅकिंग (Juice Jacking) नावाचा प्रकार सुरू झाला होता. त्यात तुम्ही एखाद्या सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावला की तो हॅक केला जाऊ शकत होता.

मोबाईल सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग करताना प्रत्येकाने या युएसबी काँडोमचा वापर करायला हवा. कारण अशा ठिकाणी अनेकदा महत्वाच्या गोष्टी चोरी होण्याची शक्यता असते. यामध्ये बँकेचे किंवा इतर पासवर्डचा समावेश असतो.

Leave a Comment