बुमराहची खिल्ली उडवून ट्रोल झाला पाकिस्तानी क्रिकेटपटू

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपूट अब्दुल रझ्झाकला भारतीय वेगवान गोंलदाज जसप्रीत बुमराहबद्दल वक्तव्य केल्याने ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. एका मुलाखतीमध्ये रझ्झाकने जसप्रीत बुमराहचा ‘बेबी बॉलर’ असा उल्लेख केला.

अब्दुल रझ्झाक म्हणाला की, त्याने ग्लेम मॅग्राथ, वसिम अक्रम सारख्या महान गोलंदाजाचा सामना केला आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह माझ्यासमोर ‘बेबी बॉलर’ आहे. रझ्झाकच्या या वक्तव्यानंतर भारतीय युजर्सनी त्याला चांगलेच ट्रोल केले.

युजर्सनी त्याला ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅग्राथविरुद्धचा त्याच्या रेकॉर्डची आठवण करून दिली. तर काहींनी 2011 च्या विश्वचषकात मुनाफ पटेलने बाद केले होते, याची आठवण केली.

रझ्झाकने पाकिस्तानकडून 46 कसोटी सामने, 265 एकदिवसीय आणि 32 टी20 सामने खेळले आहेत. या तिन्ही प्रकारत रझ्झाकचे बँटिंग एव्हरेज 30 पेक्षा कमी आहे.

Leave a Comment