रिक्षाचालकाची मदत करणाऱ्या पोलिसाचे सोशल मीडियावर भरभरून कौतूक

आपल्या नोकरीपेक्षा वेगळे काम करत एका रिक्षाचालकाची मदत करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बंगळुरू पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर या पोलिसाचा फोटो शेअर केला असून, नेटकरी या पोलीस कर्मचाऱ्याचे कौतूक करत आहेत.

बंगळुरू पोलिसांनी फोटो शेअर करत लिहिले की, ‘फोटो… स्टोरी…हॅप्पी एन्डिंग.’

फोटोमध्ये दिसत आहे की, एक पोलीस कर्मचारी रिक्षा ढकलण्यासाठी रिक्षाचालकाची मदत करत आहे. रिक्षा कोणत्या तरी कारणामुळे बंद पडल्याचे दिसत आहे व याच मुळे पोलीस कर्माचारी मदतीचा हात पुढे करतो.

या कामगिरीमुळे नेटकरी पोलिसाचे कौतूक करत आहेत. अनेक युजर्स कौतूक करत आहेत तर काहीजण इतरांनी देखील त्यांच्यापासून काहीतरी शिकावे, असे म्हणत आहेत.

Leave a Comment