वैज्ञानिकांनी बॅक्टेरियापासून तयार केली कमी कॅलरी असणारी साखर

वैज्ञानिकांनी बॅक्टेरियाच्या मदतीने फळ आणि दुधांच्या उत्पादनांपासून अशी साखर तयार केली आहे. ज्यामध्ये सामान्य साखरेच्या तुलनेत 38 टक्के कॅलरी कमी आहेत. या साखरेला टॅगाटोज म्हटले जाते. अमेरिकेच्या टफ्ट्स युनिवर्सिटीच्या संशोधकांनी म्हटले की, आतापर्यंत तरी या साखरेचे कोणतेही वाईट परिणाम समोर आलेले नाही. टॅगाटोजला अमेरिकेच्या खाद्य नियामक एफडीएकडून देखील मंजूरी मिळालेली आहे.

वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, ही साखर मधुमेहांच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरेल. सोबतच या साखरेच्या वापरामुळे दातांना कॅव्हिटी देखील होणार नाही. टफ्ट्स युनिवर्सिटीचे असिस्टेंट प्रोफेसर निखिल नायर आणि त्यांचे सहकारी जोसेफ बोबर यांनी ही साखर बनविण्याची पद्धत शोधली आहे.

नेचर कम्यूनिकेशन जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, या साखरेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होण्यासाठी वेळ लागेल. मात्र सुपरमार्केटमध्ये लवकरच ही साखर उपलब्ध होईल.

Leave a Comment