कस्टमर केअरला तब्बल 24000 वेळा कॉल केल्याने 71 वर्षीय वृद्धाला अटक

टोल फ्री नंबरवर कॉल करण्यासाठी पैसे लागत नाहीत. तक्रार आणि सुचनांसाठी कंपन्या अनेकदा ग्राहकांना टोल फ्री क्रमांकाची सुविधा देत असतात. मात्र एका टेलिकॉम कंपनीसाठी हीच गोष्ट चांगलीच डोकेदुखी ठरली. 71 वर्षीय वृद्ध व्यक्तीने तक्रार नोंदवण्यासाठी कंपनीला तब्बल 24000 फोन केले. त्यांच्या तक्रारीचे माहित नाही, मात्र कंपनीच्या तक्रारीवरून त्या वृद्ध व्यक्तीला पोलिसांनी अटक केले आहे.

जापान येथील सैतामा येथे राहणाऱ्या निवृत्त एकिटोशो ओकमोटो यांना ‘व्यवसायात अडचणी’ आणण्यासाठी अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर आरोप आहे की, मागील 2 वर्षात त्यांनी एका टेलिकॉम कंपनीला 24000 वेळा कॉल केला आहे. ते कंपनीच्या सर्विसमुळे नाराज होते व सर्विस प्रोव्हाइडरला माफी मागण्यास सांगत होते.

ऑक्टोंबरमध्ये एका आठवड्यातच त्यांनी टोल फ्री नंबरवर तब्बल 411 वेळा कॉल केला. ते रेडिओ ब्रॉडकास्ट सर्विसचा वापर करू शकत नसल्याची तक्रार करत होते. टेलिकॉम कंपन्याच्या निदर्शनास आले की, त्यांनी 2 वर्षात 24000 वेळा फोन केला आहे. कंपनीने सुरूवातीला त्यांच्या फोनकडे दुर्लक्ष केले, मात्र वैतागून पोलिसांकडे तक्रार केली.

एकिटोशी कर्मचाऱ्यांना कॉल करून म्हणायचे की, माझ्याकडे या आणि कराराचे उल्लंघन करणे व अयोग्य व्यापार करण्यासाठी माफी मागा.

तर दुसरीकडे, 71 वर्षीय एकिटोशी यांचे म्हणणे आहे की, ते या प्रकरणात पिडीत आहेत व कंपनीवर कारवाई व्हावी.

Leave a Comment