सर्वेक्षण : भारतीयांमध्ये प्रोटीनची कमतरता, 93 % लोक अनभिज्ञ

आयरन आणि कॅल्शियमप्रमाणेच भारतीयांमध्ये प्रोटीनची कमतरता आहे. 73 टक्के शहरी लोकसंख्येमध्ये प्रोटीनचे प्रमाण मानक स्तरापेक्षा कमी आहे. जेवणात याचा आहार का घ्यावा, याची देखील 93 टक्के लोकांना माहिती नाही. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे भारतीयांना प्रोटीनचे महत्त्वच माहिती नाही. लोकांचे म्हणणे आहे की, केवळ जिमला जाणाऱ्यांसाठीच प्रोटीन गरजेचे आहे. इंडियन मार्केट रिसर्च ब्यूरोच्या सर्वेक्षणामध्ये या गोष्टी समोर आल्या आहेत.

रिपोर्टनुसार, देशातील 7 शहरांमध्ये झालेल्या सर्वक्षणात भारतीयांचा समज आहे की, डाइटमध्ये प्रोटीनचा वापर हा वजन कमी करण्यासाठी केला जातो. 2018 मध्ये इनबॉडी-आयपीएसओएसच्या रिसर्चनुसार, 71 टक्के भारतीयांच्या मांसपेशी कमजोर आहेत. निश्चित प्रमाणापेक्षा 68 टक्के प्रोटीन शरीरात कमी आहे. नॅशनल सँपल सर्वेक्षण (2011-12) नुसार, ग्रामीण भागात सरासरी 56.5 ग्रॅम आणि शहरी भागात 55.7 ग्रॅम प्रोटीन घेतले जाते.

(Source)

शरीराला प्रोटीन न मिळाल्यामुळे मांसपेशी कमकुवत होतात. प्रत्येक 10 वर्षात 3 ते 5 टक्के मांसपेशींचे नुकसान होते. दररोज व्यायाम आणि प्रोटीन या मांसपेशी भरून काढण्याचे काम करतात व त्यांना एक्टिव करतात. कोणत्याही व्यक्तीने त्याच्या वजनाप्रमाणे प्रोटीन घ्यावे. जसे की, तुमचे वजन 60 किलो असेल तर दररोज 60 ग्रॅम प्रोटीन जेवणात घेणे आवश्यक आहे.

डायटेशियन आणि क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. नीतिशा शर्मा सांगतात की, प्रोटीनसाठी जर तुम्ही मांसाहारी असाल तर डाइटमध्ये मटन, चिकन, अंडी घेऊ शकतात. शाकाहारी असाल तर दूध, पालेभाज्या, शेंगदाणे, डाळी हे चांगले पर्याय आहेत.

(Source)

इंडियन मार्केट रिसर्च ब्यूरोच्या आणखी एका सर्वेक्षणामध्ये दिसून आले की, सर्वाधिक लखनऊच्या 90 टक्के लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता आहे. दुसऱ्या क्रमांकावर अहमदाबाद (84 टक्के) आणि चेन्नई (84 टक्के)  आहे. मुंबई या यादीत चौथ्या स्थानी असून, मुंबईतील 70 टक्के लोकांमध्ये प्रोटीन कमी आहे. या सर्वेक्षणामध्ये 1800 लोकांनी सहभाग घेतला होता.

प्रोटीन लहान मुलांच्या विकासाशिवाय त्यांची विचार-समजण्याची क्षमता वाढवण्यास देखील गरजेचे आहे. मांसपेशीबरोबरच आजारांशी लढण्यासाठी देखील प्रोटीन गरजेचे आहे. याशिवाय स्कीन, केस आणि फिट राहण्यासाठी प्रोटीन गरजेचे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment