2 वर्षांच्या गोंडस बाळाने गायले लता मंगेशकर यांचे गाणे, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियामुळे कधी कोण चर्चेत येईल हे सांगता येत नाही. प्रसिद्ध होण्याचे हे एक सर्वात जलद माध्यम आहे. सोशल मीडियामुळे एका रात्रीत स्टार झालेली अनेक उदाहरणे आहेत. याचे सर्वात मोठे उदाहरण रानू मंडल या आहेत. एका रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे गाताना त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर त्या स्टारच झाल्या.

रानू मंडल यांच्यानंतर आता 2 वर्षांच्या बाळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हे बाळ लता मंगेशकर यांचे लोकप्रिय गाणे ‘लग जा गले’ गात आहे. या मुलीचे नाव प्रज्ञा मेधा असल्याचे सांगितले जात आहे.

हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. लोकांना या गोंडस मुलीचे गाणे खूपच आवडत आहे.

Leave a Comment