ठाकरे कुटुंबियाकडे आहेत या आलिशान गाड्या

अनेक राजकीय घडामोडींनंतर अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे 19वे मुख्यमंत्री म्हणून काही दिवसांपुर्वीच शपथ घेतली आहे. वाइल्ड लाइफ फोटोग्राफीचे आवड असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना गाड्यांची देखील आवड आहे. आदित्य ठाकरे यांना देखील अनेकदा शानदार लग्झरी गाड्यांमध्ये पाहण्यात आलेले आहे. त्यांच्या आवडत्या गाड्यांविषयी जाणून घेऊया.

(Source)

उद्धव ठाकरे हे मर्सिडिज बेंझ जी-क्लासचा वापर करतात. जर्मनी कार कंपनी मर्सिडिज बेंझची ही प्लॅगशीप एसयूव्ही आहे. ही कंपनीच्या सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक आहे. उद्धव ठाकरे अनेकदा पांढऱ्या रंगाच्या जीएलएसमध्ये पाहायला मिळतात. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची ही अधिकारिक गाडी नाही.

(Source)

बीएमडब्ल्यू 5 जीटी –

आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या शपथ पत्रात सांगितले होते की, त्यांच्याकडे जुनी बीएमडब्ल्यू 5जीटी आहे. ज्याची किंमत 6.5 लाख रुपये आहे. निळ्या रंगाच्या या कारमध्ये निवडणुकीच्या काळात ते अनेकदा दिसले होते.

(Source)

लँड रोव्हर रेंज रोव्हर –

आदित्य ठाकरेंचा आवडता रंग कदाचित निळा असण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू व्यतरिक्त गडद निळ्या रंगाची लँड रोव्हर रेंज रोव्हर देखील आहे. याची किंमत 2 कोटी आहे. मागील वर्षी नाशिक दौऱ्यात त्यांच्या या गाडीचे तीन टायर पंचर झाले होते. त्यावेळी ही कार चर्चेत आली होती.

(Source)

राज ठाकरे यांच्याकडील मर्सिडिज बेंझ एस-क्लास

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मर्सिडिजची सर्वात लग्झरी सेडान कार आहे. अनेकदा या कारमध्ये त्यांना पाहण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्याकडे लग्झरी सेडान व्यतरिक्त टोयोटाची जुनी लँड क्रुजर एसयूव्ही देखील आहे. ही कार त्यांनी 2009 मध्ये खरेदी केली होती.

Leave a Comment