अजबच ! या देशात चित्रविचित्र आकाराच्या शवपेटीत लोकांना केले जाते दफन

सर्वसाधारणपणे अनेक देशांमध्ये लोकांना दफन करण्यासाठी ज्या शवपेटीचा वापर करतात, त्या एखाद्या लांब पेटी सारख्या असतात. मात्र जगात असाही एक देश आहे, जेथील शवपेट्या एकदम विचित्र आकाराच्या असतात.

(Source)

पश्चिम आफ्रिकेतील देश घाना आपल्या विचित्र शवपेट्यांसाठी ओळखला जातो. येथे शवपेटींना मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या काम व स्टेट्सशी जोडले जाते आणि त्याच हिशोबाने तयार केलेल्या शवपेटीत दफन केले जाते.

(Source)

सांगण्यात येते की, अशा विचित्र शवपेट्या तयार करण्याची परंपरा मच्छिमारांनी सुरू केली. मच्छिमारांना माशाच्या आकाराच्या शवपेटीत दफन केले जाते.

(Source)

घानाच्या उद्योगपतींना लग्झरी कार सारख्या शवपेटीत दफन केले जाते. यावरून त्यांचे स्टेट्स समजते.

(Source)

विमानाप्रमाणे शवपेटी बनविण्याची सुरूवात 1951 मध्ये सुरू झाली. दोन कारपेंटर असणाऱ्या भावांनी आपल्या 91 वर्षीय आईसाठी विमानासारखी शवपेटी तयार केली. त्यांची आई कधीच विमानात बसली नव्हती, त्या नेहमीच विमानात बसण्याचे स्वप्न पाहायच्या. त्यामुळे या भावांनी अशा प्रकारे त्यांचे स्वप्न पुर्ण केले.

(Source)

केवळ घानाच नाही तर परदेशात देखील आता विचित्र शवपेट्यांची मागणी आहे. स्थानिक बाजारात याची किंमत 70 हजारांच्या जवळ आहे. तर परदेशात याची किंमत 7 ते 8 पट अधिक आहे.

Leave a Comment