आता गर्भातच बाळांना संस्कारी बनवणार हे विद्यापीठ

उत्तरप्रदेशमध्ये गर्भवती असलेल्या महिलांची बाळं आता संस्कारी होणार आहेत. कानपूरच्या छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठाने गर्भातील बाळांना संस्कारी बनविण्यासाठी गर्भवती महिलांसाठी कोर्स सुरू केला आहे. 1 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या कोर्समध्ये गर्भवती महिलांबरोबरच अविवाहित मुली देखील सहभागी होवू शकतात.

विद्यापाठीच्या कुलपती प्रोफेसर निलिमा गुप्ता म्हणाल्या की, आजकाल या महत्त्वाच्या विषयाकडे कोणी लक्ष देत नाही. लोकांच्या जागृकतेसाठी हा कोर्स सुरू करण्यात आलेला आहे. सध्या याचा कालावधी 3 ते 6 महिने आहे. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर सर्टिफिकेट देण्यात येईल. 12 वी झालेल्या महिला या कोर्ससाठी अर्ज करू शकतात.

त्यांनी सांगितले की, 1 जानेवारीपासून हा कोर्स सुरू होईल. या कोर्सचा उद्देशच येणाऱ्या पिढीचे भविष्य चांगले ठेवणे आणि त्यांना संस्कारी बनविण्यासाठी जागृक करणे हा आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, यामध्ये गणेश शंकर विद्यार्थी मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर गेस्ट लेक्चरर असतील. याशिवाय इतर शिक्षक देखील असतील. या प्रकारचा कोर्स घेणारे हे पहिलेच विद्यापीठ आहे.

तीन महिन्यांचा कोर्स हा ‘इन गर्भ संस्कार’ आणि 6 महिन्यांचा कोर्स हा ‘इन संस्कार’ नावाने चालवला जाईल. गर्भवती महिलांच्या बाळांना गर्भातच संस्कार देण्याची तयारी करण्यात आलेली आहे.