या मॉडेलच्या सुरक्षेवर दरमाह 2 कोटी रुपये खर्च

काइली जेनर ही एक अमेरिकन मॉडेल आहे. अमेरिकेबरोबरच जगभरात तिचे कोट्यावधी चाहते आहेत. काइली मॉडेलिंग जगतातील एक टॉपचे नाव असून, लोकांनी तिच्या बाबतीतील प्रत्येक गोष्टीची माहिती हवे असते. खाण्यापासून ते कपड्यांपर्यंत सर्व गोष्टी लोक इंटरनेटवर सर्च करत असतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का काइली जेनरच्या सुरक्षेसाठी किती पैसे खर्च होतात ?

View this post on Instagram

u get the best of me

A post shared by Kylie 🤍 (@kyliejenner) on

काइली जेनरची आई कॅटलिन जेनरने एका मुलाखतीत तिच्या सिक्युरिटीवर होणाऱ्या खर्चाबद्दल माहिती दिली आहे. यावेळी काइलीच्या सुरक्षेविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तिच्या आईने सांगितले की, महिन्याला सिक्युरिटीवर तब्बल 3 ते 4 लाख डॉलर (जवळपास 2 कोटी रुपये) खर्च होतात.

2018 मध्ये फॉर्ब्स मॅग्झिनने काइली जेनरला यंगेस्ट सेल्फ-मेड बिलेनियर घोषित केले होते. जेनरची कंपनी काइली कॉस्मेटिक्सचे वॅल्यूएशन तब्बल 1.2 अब्ज डॉलर आहे. जेनर जगातील सर्वात तरूण अब्जाधीश आहे. तिची संपत्ती 1 अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे.

Leave a Comment