देशाला भिखेचे डोहाळे, या राजाने 15 पत्नींसाठी खरेदी केल्या 127 कोटींच्या आलिशान गाड्या


आम्ही आजवर आपल्या जगभरातील अनेक चित्र-विचित्र गोष्टींबद्दल सांगितले आहे आणि सांगत देखील आहोत. पण आम्ही आज अशा एका देशाबद्दल सांगणार आहोत, जो आपल्या विचित्र प्रथांसाठी ओळखला जातो. त्या देशाचे नाव तुम्ही क्वचितच ऐकले असेल. तो देश आहे इस्वातिनी (Eswatini). आपल्या गरीबीसाठी जगात दक्षिण आफ्रिकेमधील हा देश प्रसिद्ध आहे. हा जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक असून, येथील सुमारे 60 टक्के लोक दारिद्र्य रेषेखालील जगतात. पण तरी देखील या देशाचा राजा त्याच्या विलासी जीवनासाठी प्रसिद्ध आहे. मस्वति-3 (Mswati III) या राजाचे सध्या येथे राज्य आहे. नुकतेच आपल्या 15 पत्नींसाठी या राजाने तब्बल 127 कोटी रुपयांच्या आलिशान गाड्या विकत घेतल्या आहेत.


एकीकडे त्याच्या देशाला भिखेचे डोहाळे लागले आहेच, त्याचबरोबर तेथील लोकांचे खाण्याचे देखील वांदे असताना तेथील राजाचे आपल्या राणींप्रति असलेले प्रेम लक्षणीय आहे. त्यांच्यासाठी त्याने नुकत्याच 127 कोटी रुपयांच्या आलिशान गाड्या विकत घेतल्या आहेत. आपल्या 15 पत्नींसाठी 15 रोल्स रॉयसेस आणि डझनभर बीएमडब्ल्यू कार राजा मस्वति-3ने खरेदी केल्या आहेत. आता सामान्य जनता या गोष्टीमुळे राजाचा विरोध करत आहे.

1434 कोटी रुपये या राजाची स्वतःची एकूण संपत्ती असून मस्वति-3 राजाचे खासगी विमान तसेच स्वतःचे विमानतळ आहे. 1986 पासून मस्वति-3 या देशाचा राजा आहे. हा राजा याआधी देखील वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. याआधी तो 1841 कोटी रुपये खर्च करून लक्झरी जेट खरेदी करण्यासाठी वादात अडकला होता.

दरवर्षी टॉपलेस कुमारी मुलींचे परेड इस्वातिनी देशात असते आणि राजा यामध्ये प्रत्येक वर्षी स्वत: साठी नवीन पत्नीची निवड करतो. असे म्हटले जाते की, ज्या मुली या परेडमध्ये येत नाहीत त्यांना शिक्षा केली जाते. याआधी अनेकवेळा टॉपलेस कुमारी मुलींच्या प्रर्दशनामध्ये राजाची पत्नी निवडण्याच्या प्रथेवर आक्षेप घेण्यात आला होता, परंतु बर्‍याच निषेधानंतरही ही प्रथा थांबविण्यात आली नाही. अशाप्रकारे या राजाने एकूण 15 विवाह केले आहेत.

Leave a Comment