बुल्गारियात भरतो नवरींचा बाजार, पैसे देऊन विकत घेतली जाते बायको

bride
बुल्गारियातील स्टारा जागोर नावाच्या ठिकाणी तीन वर्षातून एकदा नवरींचा बाजार भरतो. तरुण मुलगा येथे येऊन आपल्या पसंतीच्या मुलीची चक्क खरेदी करून तिला आपली पत्नी बनवू शकतो. अशा गरीब लोकांकडून हा मेळावा अर्थातच लग्नाचा बाजार लावलो जातो ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही. ते जेणेतरून आपल्या मुलीचे लग्न लावून देऊ शकतील.
bride1
चांगल्या कपड्यात तरूणींना म्हणजे नवरी मुलीला नटवून बसवले जाते. विकली जाणाऱ्या नवरीत सर्व वयोगटातील महिला असतात. नवरी खरेदी करण्यासाठी तरुणासोबत त्याचे आई-वडिलही येतात. मुलगा प्रथम आपल्याला आवडेल अशी मुलगी शोधतो. त्यानंतर बोलणी चालणी होतात. नवरी पसंत आल्यानंतर तो आपल्या आई-वडिलांना सांगतो मग दोन्ही वर-वधूचे पालक खरेदीची रक्कम ठरतात. बुल्गारियात नवरी खरेदीचा हा प्रकार गरीब लोकांत परंपरेने चालत आहे. त्याला कोणताही कायदा रोखू शकत नाही.
bride2
ही प्रथा गरीब लोकांची आर्थिक स्थिती ध्यानात घेऊन सुरु केली होती. असेच लोक बाजारात येतात ज्यांची मुलीचे लग्न करण्याची आर्थिक कुवत नसते. नवरी मुलगी बाजारात एकटी येत नाही. परिवारातील सदस्य तिच्यासमवेत असणे आवश्यक असते. आपल्याकडे नव-या मुलाला हुंडा दिला जातो. मात्र तेथे याच्या उलट प्रथा आहे. येथे मुलाच्या पालकांना मुलीच्या पालकांना पैसे द्यावे लागतात. यामुळे गरीबांना आर्थिक मदतही होते. हे गृहित धरूनच कायदा त्याला परवानगी देतो. तसेय याचे काटेकोरपणे पालन केले जाते. हा बाजार बुल्गारियातील कलाइदझी समुदायाद्वारे लावला जातो. या समुदायातील मुलीशिवाय बाहेरील व्यक्ती नवरी म्हणून स्वीकारली जात नाही.

Leave a Comment