उद्या होऊ शकते ठाकरे सरकारची बहुमत चाचणी


मुंबई : उद्याच उद्धव ठाकरे सरकारची बहुमत चाचणी होऊ शकते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 6 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. उद्धव ठाकरे यांना 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्यामुळे उद्धव यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकार उद्याच बहुमत सिद्ध करण्याची शक्यता आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये पुन्हा कुरघोडीचे राजकारण सुरू झाले असून दोन्ही पक्षात विधानसभा अध्यक्षपदावरून धुसफूस सुरु आहे. काँग्रेसला महाविकास आघाडीच्या सत्तावाटपात विधानसभा अध्यक्षपद देण्याचा निर्णय बुधवारी झाला, पण काल सकाळी अध्यक्षपदाऐवजी उपमुख्यमंत्रिपद मिळावे, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. पण एकदा निर्णय झाल्यानंतर पुन्हा बदलणार नाही अशी ठाम भूमिका राष्ट्रवादीने घेतल्यामुळे दोन्ही पक्षातील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

सध्या महाराष्ट्र विकास आघाडीकडे सध्या शिवसेनेचे 54, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 54 आणि काँग्रेसचे 44 आमदार आहे. तसेच अपक्ष आमदारांचा देखील आघाडीला पाठींबा आहे. तिन्ही प्रमुख पक्ष आणि अपक्ष 162 आमदारांनी मुंबईतील ग्रँड हयातमध्ये ओळखपरेड केली होती. परडेच्या नावाखाली महाविकास आघाडीचे हे शक्तीप्रदर्शन होते. याद्वारे भाजप आणि जनतेला आपले संख्याबळ दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता. शक्तीप्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

Leave a Comment