यामुळे निरोगी लोकांना जिमला न जाताही लाभते दीर्घायुष्य

जर तुम्हाला स्वतःला निरोगी ठेवायचे असेल, तर जिमला जाण्याची काहीही गरज नाही. हे आम्ही नाही तर टाइम मॅग्झिनने केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. सर्वेक्षणानुसार, सर्वाधिक आयुष्य जगणारी लोक जिमला जात नाही.

2018 मध्ये टाइम मॅग्झिनने ब्ल्यू झोन्समध्ये एक सर्वेक्षण केले होते. हा तो झोन आहे जेथे लोक सर्वाधिक वर्ष जगतात. यामध्ये ओकिनाव्हा (जापान), नीकोया (कोस्टा रिका), इकारिया (ग्रिस) या भागातील लोकांचा समावेश आहे.

यांच्यावर केलेल्या रिसर्चनुसार, येथे लोक जिमला जात नाही, तसेच मॅरोथॉनमध्ये देखील भाग घेत नाहीत. तर त्या ऐवजी ते शारिरिक हालचाली जसे की, गार्डनिंग, पायी चालणे, घर आणि बाहेरील कार्य मशिन्सच्या जागी हातांनी करणे या गोष्टी करतात.

रिसर्चमध्ये समोर आले की, अधिक काळ निरोगी जगायचे असेल तर मशिन ऐवजी हातांनी काम करणे गरजेचे आहे. असे असले तरी, 100 वर्षांपुर्वी 90 टक्के लोक पायी चालणे अथवा इतर शारिरिक कार्यामध्ये भाग घेत असे. मात्र आज केवल 10 टक्के लोक असे करतात.

तज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्ही देखील दररोज 15 मिनिटे चालणे, तसेच घरातील सामान घेऊन येणे, मुलांना शाळेत चालत सोडायला जाणे इत्यादी गोष्टी करू शकता.

अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, आठवड्यातून 6 तास चालणे हे कॅन्सर, ह्रदयाचे आजार इत्यादी गोष्टी कमी करते. एवढेच नाही तर चालल्याने तुमचा मेंदू देखील अधिक चांगल्या प्रकारे कार्य करतो. त्यामूळे जेवढे शक्य आहे, तेवढे चालणे गरजेचे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment