राज्यपालांच्या पचनी पडला नाही शपथविधी दरम्यानचा नामोल्लेख


मुंबई : गुरुवारी शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडला. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या शपथविधी सोहळ्यावर नाराजी व्यक्त केली आहे. प्रोटोकॉलनुसार शपथविधी सोहळ्याची व्यवस्था नसल्याचा आक्षेप राज्यपालांनी नोंदवला आहे. राज्यपालांनी शपथविधीदरम्यान मंचावरील अवस्थेवर नाराजी दर्शवली आहे.

राज्यपाल कोश्यारी यांच्यामते, प्रोटोकॉलनुसार शपथविधी सोहळ्याची व्यवस्था नव्हती. प्रशासनाला शपथविधीची व्यवस्था करु दिली नाही, ज्यामुळे मंचावर अव्यवस्था पाहायला मिळाली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आक्षेपही नोंदवला आहे.

त्याचबरोबर आमदारांनी शपथ घेण्याआधी आपापल्या नेत्यांची नावे घेतली, यावरही कोश्यारी नाराज होते. ते म्हणाले की, असे काही भविष्यात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात होऊ नये. शपथविधी सोहळ्याच्या प्रोटोकॉलच्या हे विरोधात आहे. अशी कृत्ये शपथविधी सोहळ्याची प्रतिष्ठा खालावते.

Leave a Comment