‘द बॉडी’मधील ‘झलक दिखलाजा’चे रिक्रियेटेड व्हर्जन रिलीज


एकेकाळी बॉक्स ऑफीसवर बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी आणि हिमेश रेशमियाचे संगीत असलेल्या चित्रपटांची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत होती. हिमेशने इम्रानच्या बऱ्याच चित्रपटांना संगीत दिले आहे त्याचबरोबर त्यातील बरीच गाणी देखील गायली आहेत. आजही सोशल मीडियावर यापैकी त्यांचे ‘झलक दिखलाजा’ हे गाणे हिट आहे. आता याच गाण्याचे रिक्रियेटेड व्हर्जन रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे इम्रानच्या आगामी ‘द बॉडी’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हिमेश रेशमियाने ‘द बॉडी’ चित्रपटासाठी पुन्हा इम्रानसाठी गाणे गायले असल्यामुळे पुन्हा पडद्यावर ‘झलक दिखलाजा’ गाण्याची जादू पाहायला मिळत आहे. या गाण्याला अवघ्या काही तासातच १ मिलियन पेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत.

या गाण्याला तनिष्क बागचीने रिक्रियेट केले आहे. आत्तापर्यंत त्याने केलेली रिक्रियेटेड गाणी सोशल मीडियावर हिट ठरली आहेत. स्वत: या गाण्याचे व्हर्जन इम्रान हाश्मीने निवडले आहे. या गाण्याचा टीझर त्याने शेअर केल्यानंतर चाहत्यांना या गाण्याची उत्सुकता होती.

‘द बॉडी’ हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असून प्रेक्षकांचा या चित्रपटाच्या ट्रेलरवर आणि गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटाची टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा एका स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाद्वारे मल्याळम दिग्दर्शक जेथु जोसेफ हिंदी चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचीही महत्वपूर्ण भूमिका आहे. यामध्ये शोभिता धुलिपाला आणि वेदिका या नवोदित अभिनेत्रींचीही भूमिका पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट १३ डिसेंबरला रिलीज होणार आहे.

Leave a Comment