टाटा मोटर्स लवकरच लाँच करणार 7 सीटर एसयूव्ही

टाटा मोटर्स लवकरच आणखी एक सात सीटर एसयूव्ही लाँच करणार आहे. ही एसयूव्ही टाटा Harrier’s प्रमाणेच असेल. या नवीन एसयूव्हीचे नाव टाटा Gravitas ठेवण्यात आले आहे. ही नवीन एसयूव्ही पुढील वर्षी होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये लाँच केले जाईल.

रिपोर्टनुसार, या नवीन एसयूव्हीचे प्रोडक्शन सुरू झाले आहे. टाटाची ही नवीन एसयूव्ही हॅरियरपेक्षा 63 एमएम लांब असेल. याची लांबी 4664 एमएम असेल. तर रुंदी 1894 एमएम, उंची 1786 एमएम आहे. तर व्हिलबेस 2741 एमएम असेल.

टाटा ग्रॅव्हिटासमधील इंजिनबद्दल सांगायचे तर यामध्ये 2.0 लीटर चार सिलेंडर डिझेल इंजिन असू शकते. हे इंजिन 170 बीएचपी पॉवर आणि 350 एनएम टार्क जनरेट करते. या एसयूव्हीमध्ये 6 स्पीड मॅन्यूअल गिअरबॉक्स आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशन मिळेल. याशिवाय कंपनी हॅरियर आणि ग्रॅव्हिटासच्या पेट्रोल इंजिनवर देखील काम करत आहे.

टाटाची ही नवीन एसयूव्ही फोर्ड इन्डोव्हर, टाटा फोर्च्युनर आणि महिंद्रा अल्ट्रास जी4 ला टक्कर देईल.

 

Leave a Comment