आता वाहतूक नियमांचे उल्लंघन हे पुतळे रोखणार

वाहतुकीचे नियम हे लोकांच्या सुरक्षेसाठी बनलेले आहेत. मात्र अनेक जण या नियमांकडे दुर्लक्ष करतात. जेथे पोलीस दिसत नाही, तेथे लोक सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करतात. यातच लोकांनी वाहतुकीचे पालन करावे यासाठी बंगळुरू पोलिसांनी खास अभियान सुरू केले आहे. बंगळुरू पोलिसांनी पुतळ्यांना ट्रॅफिक पोलिसांचा गणवेश घालून रस्त्यावर नेमणूक केली आहे. जेणेकरून वाहनचालक पुतळ्यांना पोलीस कर्मचारी समजून नियमांचे पालन करतील.

(Source)

वाहतूक पोलिस सध्या या अभियानाचे ट्रायल सुरू आहे. या अंतर्गत पुर्ण शहरात असे 30 पुतळे उभे केले जातील. पोलिसांचे म्हणणे आहे की, यामुळे वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करेल. चीफ ऑफ ट्रॅफिक रवी कांटे गोवडा म्हणाले की, येथे असे अनेक लोक आहेत, जे वाहतूक पोलीस नसताना नियमांचे उल्लंघन करतात. आम्ही पुतळ्यांना पोलिसांच्या वर्दीत यासाठी उभे केले आहे की, जेणेकरून लोकांना वाटेल की पोलिस त्यांना बघत आहे. प्रत्येक दिवशी या पुतळ्यांची जागा बदलली जाते.

Leave a Comment