आरोग्य राखण्यासाठी गहू टाळण्याचा प्रयत्न करून बघणे आवश्यक

आपल्या देशात आज गहू हा सर्वसाधारण लोकांच्या  आहारातील मुख्य घटक आहे. दैनंदिन आहारात गव्हाचे स्थान अत्यंत महत्वाचे असून त्याचा वापरही मठ्या प्रमाणावर केला जातेा. यामुळेच भारतात गहू पिकवण्याचे प्रमाण वाढले आहे.गव्हाच्या अनेक  जातीही विकसित झाल्या आहेत व या गव्हापासून बनविलेल्या पेाळी, चपाती ,पराठा, पाव, पुर्‍या, केक, बिस्कीटे आपल्या आहाराचा अविभाज्य भाग बनली आहेत.  आजकाल यंत्रयुगामुळे एकंदरीत सुखासीनतेकडे झुकलेली जीवनपद्धती व त्यामुळे मेदोवृद्धी, स्थौलत्व, हृदयरोग यांचे ेवाढलेले प्रमाण पाहिले तर गहू खाताना पुन्ंहा एकदा विचार करावा अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे.

आयुर्वेदामध्ये गव्हाचे गुण पुढीलप्रमाणे वर्णिले आहेत. तो स्वादाने मधुर, थंड, गुरू, सारक, वायुनाशक, पित्तनाशक, कफकारक, पचायला जड पण शरीराचे पोषण करणारा असा आहे. पण आपल्या देशातील हवामानाचा विचार केला तर मात्र गव्हापेक्षा ज्वारी, बाजरी, मका , तांदूळ यांचे सेवन अधिक उपयुत्त* ठरते. गव्हाच्या सेवनाने शरीरात येणारे बदल हे गैरसोयीचे आहेत असे अनेक आयुर्वेदाचार्यांचे निरीक्षण आहे.

आजकाल वाढत्या वयाच्या मुलांमध्ये अभ्यास, संगणक, टी.व्ही. व इतर अनेक कार्यक्रम, तीव्र स्पर्धा यामुळे व्यायामाला वेगळा वेळ दिला जात नाही. त्यामानाने आहार अधिक घेतला जातेा. घरात अनेक गृहोपयोगी यंत्रे ही आजकालची गरज अथवा प्रतिष्ठेची ओळख झाल्याने स्त्रियांचे शारीरिक श्रम नक्कीच कमी झाले आहेत.तसेच एक्झिक्युटीव्ह क्लास असणार्‍या पुरुषांमध्येही शारीरिक श्रम कमी पण या सर्वच गटांवर मानसिक ताणांचे ओझे प्रचंड आहे व त्याला बदललेली गतीमान जीवनशैली कारणीभूत आहे. याचा परिणाम शरीरातील स्नायू व हाडे यांच्यावर ताण येण्यात होतो. साहजिकच मणक्यांचे सांध्यांचे विकार बळावत जातात.

मानसिक ताणामुळे रक्तातील कोलेस्टोरॉलची पातळी वाढते. गव्हाच्या सेवनाने त्याला अधिक हातभार लागतो व त्यामुळे रक्ताचेही घनत्व वाढते असे संशेाधनात आढळले आहे.  केव्हा व किती खावे याची एक मोठी सुंदर व्याख्या आहे. जेव्हा काम करण्याची ताकद संपत येते तेव्हा खावे व किती खावे तर पुन्हा काम करण्याची उभारी येईल इतपतच खावे. आज आहारात तिन्हीत्रिकाल पोळी व गव्हाच्या अन्य स्वरूपातील पदार्थ खाल्ले जात असतात. मात्र वजन वाढ कमी करण्यासाठी आहारातील तेल तूप कमी करण्याचा सल्ला डॉक्टर लोक देत असतात. वास्तविक ज्वारीची. बाजरीची एक मोठी भाकरी व १ चमचा तूप अथवा लोणी हा देान पोळ्यांपेक्षा अधिक चांगला आहार आहे हे मान्य केले जात नाही.

गव्हात स्निग्धतेचा अंश मोठा आहे, गहू आतड्याला चिकटून बसतो व त्यामुळे तो बर्‍याच रोगांना आमंत्रण देतो याकडे केले जाणारे दुर्लक्ष फार महागात पडणारे आहे याचा विसर पडू देता कामा नये. गव्हामुळे शरीराचे चापल्या कमी होते असेही आढळले आहे.स्त्रियांमधील वाढता सुखवस्ुतपणा, वेळी अवेळी खाणे, व प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनांमुळे पदार्थांची बदललेली रूची यामुळे स्थौल्य वाढते. स्थूल मुलांमध्ये आठवड्ंयातून देान दिवस जरी गहू बंद केला तरी त्यांचे शरीरस्वास्थ टिकायला मदत होते हे अनुभवातून सिद्ध झाले आहे. एखाद्या वेळी बदल म्हणून पाव भाजून देता येतो. कारण पाव बनविताना अंाबविण्याची प्रक्रीया घडते व त्यामुळे तो पचायला हलका होतो. हॉटेलातील तंदूर रोटीऐवजीही पाव कधीही चांगला ठरतो.

मानसिक ताण हा आजच्या जीवनशैलीतील प्रमुख व न टाळता येणारा विकार आहे. या ताणामुळे रक्तातील कोलेस्टोरॉलमध्ये नक्कीच बदल घडतात हे जगभर सिद्ध झाले आहे. या बदलात गहू सेवनाने भर पडते हे कितीजणांना माहिती आहे? आज नोकरी बदलणे शक्य नाही पण शरीरात मोठे , चांगले बदल आणणे शक्य आहे. फिटनेस, एनर्जी गेन. मानसिक स्थिरता राखण्यासाठी आहारातून गव्हाला हद्दपार करा. शरीराचे चांगले पोषण होण्यासाठी रक्ताचे घनत्व प्रमाणित असणे आवश्यक आहे  व हे साध्य करण्यासाठी स्निग्ध गुणात्मक पदार्थ कमी खाणे गरजेचे आहे. अन्य पदार्थातून जेवढे स्निग्धत्व पोटात जाते त्यापेक्षा कितीतरी अधिक गहू स्निग्ध गुणाचा असून तो जास्त प्रमाणात पोटात जात असतो.

एक चमचा तूप व ५० ग्रॅमची पोळी सारखीच सिग्धता देतात पण पोळी शरीराला अधिक हानी पाहोचवत असते. त्यातूनही मैदा सेवन हे आणखीच धोकादायक असते. मैदा गव्हातून बाजूाला काढला जातो व तो गव्हाचे सत्व असतो म्हणजेच मैदा ही गव्हाची स्निग्धता आहे.  हा मैदा आहारात असेल तर तो आतड्याला चिकटतो. तो पचवायला शरीराला त्रास होतो . याच्या एकत्रित परिणामाने शरीरात येणारे बदल सुखकर नसतातच पण अनारोग्याला आमंत्रण देणारे ठरतात.

यासाठीच आपल्या आहारातून गहू बाजूला काढून पाहण्याचा प्रयोग प्रत्येकाने फत्त* आठ दिवस तरी करावा व त्यामुळे आपल्यात काय बदल जाणवतात याचे निरीक्षण करावे  असे सुचवावेसे वाटते. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी निदान कणकेऐवजी मैदा बाजूला काढल्यावर जो आटा उरतो तो वापरावा,. गहू बंद केल्याने होणारे बदल हे चाळीशी ओलांडलेल्यांना अधिक प्रकर्षाने जाणवतात असे सिद्ध झाले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

3 thoughts on “आरोग्य राखण्यासाठी गहू टाळण्याचा प्रयत्न करून बघणे आवश्यक”

  1. मधुमेह रोग असलेले लोक भात खात नाहीत तर फ़क्त पोळी खान्यावर त्यांचा जोर असतो
    हा लेख वचल्यावर आता काय खा य च

  2. मधुमेह रोग असलेले लोक भात खात नाहीत तर फ़क्त पोळी खान्यावर त्यांचा जोर असतो
    हा लेख वचल्यावर आता काय खा य चे

Leave a Comment