Video : उत्तराखंडमध्ये रेल्वेतून काढण्यात आला तब्बल 10 फूटी किंग कोब्रा

उत्तराखंडमधील एका रेल्वेमधून 10 फूट लांब किंग कोब्रा बाहेर काढल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विटर आणि फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर करण्यात येत आहे. हा व्हिडीओ उत्तराखंड वनविभागाचे फिल्ड फॉरेस्टर डॉ. पीएम धकाते यांनी शेअर केला आहे.

28 सेंकदाच्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रेल्वेच्या चाकाच्या येथे गुंडाळा करून बसलेल्या सापाला काही जण बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

डॉ. धकाते यांनी सांगितले की, उत्तराखंड वन विभाग आणि रेल्वे प्रोटेक्शन दलाने संयुक्तरित्या मिळून काथोदाम स्टेशन येथे सापाला रेस्क्यू केले. यावेळी प्रवाशांची काळजी घेण्यात आली. तसेच रेल्वेचे वेळापत्रक लक्षात घेऊन, हे कार्य करण्यात आले.

व्हिडीओ पोस्ट केल्यापासून आतापर्यंत 5 हजारांपेक्षा अधिक जणांनी बघितला आहे. युजर्स वनविभागाच्या कार्याचे कौतूक करत आहेत. सापाला रेस्क्यू केल्यानंतर त्याला जंगलात सोडून देण्यात आले.

Leave a Comment