पक्ष धोरणाच्या विरोधात अजित पवारांचा निर्णय – शरद पवार


मुंबई – यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवारांचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाविरोधातील असल्याचा म्हटले आहे. भाजपच्या विरोधात महाराष्ट्रातील जनमत असून असे असताना जनता त्यांच्यासोबत जाण्याच्या निर्णयाला पूर्ण विरोध दर्शवेल असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यांच्यासोबत १० ते ११ सदस्य गेल्याचे समजते. जे अपात्र होतील त्यांच्याविरोधात आम्ही तीन पक्ष काय करायचे ते करु असेही पवार यांनी म्हटले आहे. पक्षांतर बंदीचा कायदा देशात करण्यात आला आहे हे अनेकांना माहित नसल्यामुळे त्यानंतर जी कारवाई होईल त्यासाठी योग्य ती कारवाई आम्ही करु. भाजपला बहुमत सिद्ध करता येणार नाही. त्यानंतर आम्ही सरकार स्थापन करु असे पवारांनी ठामपणे सांगितले.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाराष्ट्रात सक्षम सरकार बनावे यासाठी एकत्र आले होते. तिन्ही पक्षांकडे बहुमताचा आकडा होता. शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४ तर काँग्रेसचे ४४ अशी संख्या होती. शिवसेनेला काही अपक्षांनीही साथ दिली होती. १७० च्या आसपास आमची आमदारसंख्या जात होती. काल आमची बैठक पार पडली. या बैठकीत काही प्रश्नांबाबत चर्चा राहिली होती. पण सकाळी आम्हाला राजभवनावर राज्यपालांकडे आणण्यात आलं आहे. अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली काही सदस्य तिथे गेल्याचेही समजले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाच्या विरोधातील असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment