Video : …आणि रूम सर्व्हिस म्हणून चक्क रोबॉटच घेऊन आला कॉफी

समजा, तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये राहिला गेला असाल आणि काहीतरी ऑर्डर केल्यावर रूम सर्व्हिस म्हणून स्वतः रोबॉट अचानक तुमच्या समोर आला तर ?  नक्कीच तुम्हाला थोडावेळ आश्चर्याचा धक्का बसेल. अशीच काहीशी घटना चीनच्या शांघाई येथील एका गेस्ट सोबत घडली. महिलेने कॉफी ऑर्डर केली होती. मात्र महिलेल्या सर्व्हिस देण्यासाठी चक्क रोबॉटच आला. हे पाहून महिलेला देखील आश्चर्याचा धक्का बसला.

वॉशिंग्टन पोस्टच्या बिजिंग येथील ब्यूरो चीफ एना फीफिल्ड यांनी ट्विटरवर या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, मी शंघाईच्या एका हॉटेलमध्ये कॉफी पॉड्ससाठी कॉल केला होता आणि ते अशाप्रकारे माझ्यापर्यंत पोहचले.

व्हिडीओला शेअर केल्यापासून आतापर्यंत 1 मिलियन पेक्षा अधिक वेळा पाहण्यात आले आहे. तर शेकडो युजर्सनी रिट्विट्स आणि लाईक्स केले आहे.

अनेक युजर्सनी कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. अनेकजण अशाप्रकारची सर्व्हिसपाहून आश्चर्यचकित झाले. तर काहींनी कॉफी पॉड्सची साईज थोडी मोठी असते, तर चांगले झाले असते, असे देखील म्हटले.

Leave a Comment