रिअलमीचे दोन दमदार स्मार्टफोन भारतात लाँच

रिअलमीने भारतात आपले दोन नवीन स्मार्टफोन रिअलमी एक्स2 प्रो आणि रिअलमी 5एस लाँच केले आहेत. रिअलमी एक्स2 प्रो च्या 8जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे. तर 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 33,999 रुपये आहे. रिअलमी 5एस ची सुरूवाती किंमत 9999 रुपये आहे.

रिअलमी एक्स2 प्रो स्मार्टफोन 50W सुपर VOOC फ्लॅश चार्ज टेक्नॉलजी सपोर्ट करतो. यामध्ये 4,000 mAh ची दमदार बॅटरी देण्यात आलेली आहे. कंपनीने दावा केला आहे की, केवळ 35 मिनिटात हा फोन फुल चार्ज होतो. याशिवाय कंपनीने दावा केला आहे की, पबजी खेळताना देखील फोन 30 मिनिटात 80 टक्के चार्ज होईल.

 

(Source)

रिअलमी एक्स2 प्रोमध्ये 90 Hz अल्ट्रा स्मूथ डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यामध्ये FHD+ रिज्योलुशनसोबत 6.5 इंचची सुपर एमोलेड स्क्रीन मिळेल. हा फोन नेप्च्यून ब्लू आणि लूनर व्हाइट रंगात मिळेल. हा स्मार्टफोन ColorOS 6 वर बेस्ड आहे. यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर देण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनच्या मास्टर एडिशनमध्ये 12 जीबी रॅम+256जीबी स्टोरेज मिळेल.

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यामध्ये 4 रिअर कॅमेरे देण्यात आलेले आहेत. यातील प्रायमेरी कॅमेरा 64 मेगापिक्सल आहे. याशिवाय 8 मेगापिक्सल+13मेगापिक्सल+2मेगापिक्सल कॅमेरे देण्यात आलेले आहेत. यामध्ये फ्रंटला 16 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आलेला आहे.

(Source)

रिअलमी 5एस स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन –

कंपनीने रिअलमी 5एस क्रिस्टल रेड, क्रिस्टल ब्लू आणि क्रिस्टल पर्पल या रंगात लाँच केले आहे. या फोनमध्ये देखील 4 रिअर कॅमेरे देण्यात आले असून, याचा प्रायमेरी कॅमेरा 48 मेगापिक्सल आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 665 AIE चिपसेट प्रोसेसर मिळेल. फोनमध्ये 5,000 mAh दमदार बॅटरी देण्यात आलेली आहे. हा फोन 2 व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 4जीबी रॅम+64जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9999 रुपये आहे. तर 4जीबी रॅम+128जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे.

 

Leave a Comment