पोलीस दलातील गावठी कुत्रा पडला विदेशी कुत्र्यांवर भारी

नेहमी लँब्राडोर, जर्मन शेफर्ड आणि डोबरमॅन सारखी परदेशी कुत्र्यांच्या प्रजातींना सैन्यात समावेश केला जातो. या कुत्र्यांची कोणत्याही वस्तूंचा शोध घेण्याची क्षमता आणि धोका ओळखण्याची क्षमता जबरदस्त असते.

मात्र आता भारतीय कुत्रे देखील या बाबतीत मागे नाहीत. देशी कुत्रे विविध वातावरणानुसार अनुकूल असतात. या कुत्र्यांची नजर आणि मागोवा घेण्याची क्षमता चांगली असते. मात्र ही कुत्री अशीच रस्त्यावर भटकताना आपण पाहत असतो.

मात्र उत्तराखंड पोलिसांनी भारतीय कुत्र्यांच्या या गुणांना समजून त्यांना पोलिस दलात सहभागी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी उत्तराखंड पोलिस एका भटक्या कुत्र्याला ट्रेनिंग देखील देत आहेत. उत्तराखंड पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत याबाबत माहिती दिली.

त्यांनी लिहिले की, भारतीय कुत्र्यांना टीममध्ये सहभागी करण्यासाठी त्यांना ट्रेनिंग देण्यात येत आहे आणि ते परदेशी कुत्र्यांच्या तुलनेत खूप पुढे निघून गेले आहेत.

उत्तराखंड पोलिसांनी या कुत्र्यांचा व्हिडीओ देखील शेअर केला असून, नेटकऱ्यांना देखील देशी भटक्या कुत्र्यांना अशाप्रकारे सहभागी करून घेणे खूपच आवडले.

 

https://twitter.com/pattarvinay65/status/1196326041477775360

नेटकरी देखील उत्तराखंड पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतूक करत आहेत.

Leave a Comment