शाहरुखची मुलगी सुहाना खानची पहिली शॉर्ट फिल्म रिलीज


बॉलिवूडचा ‘बादशाह’ शाहरुख खानची मुलगी सुहाना खानची डेब्यू फिल्म ‘द ग्रे ग्रे पार्ट ऑफ ब्लू’ आज रिलीज झाली आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये सुहानाने उत्तम अभिनय केला आहे. सुहानाचा अभिनय पाहून तिचे चाहते सोशल मीडियावर तिचे कौतुक करत आहेत. त्याचवेळी ही शॉर्टफिल्म रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

चित्रपटाची कहाणी एका तरुण जोडप्याभोवती फिरत आहे. दोन दिवसांच्या रोड ट्रिपमध्ये, या जोडप्यास त्यांच्या नात्याच्या सत्यतेचा सामना करावा लागतो. थियोडोर गिमेनो यांनी इंग्रजी भाषेतील शॉर्ट फिल्म ‘द ग्रे ग्रे पार्ट ऑफ ब्लू’ चे दिग्दर्शन केले आहे.

या चित्रपटात सुहानाची भूमिका ‘सॅंडी’ आहे, जी तिच्या प्रियकराची (रॉबिन गोन्ला) आई-वडिलांशी ओळख करुन देण्यासाठी उत्सुक आहे. चित्रपटाच्या सुरूवातीला सुहाना तिच्या प्रियकरची वाट पाहत गाडीवर बसली आहे.

त्यानंतर, ते दोघे हॉटेलमध्ये थांबतात आणि त्यांचे मागील दिवस आठवतात आणि संबंधित गोष्टी एकमेकांसमोर ठेवतात. या शॉर्ट फिल्ममध्ये दोन पात्र दिसले आहेत. एक म्हणजे सुहाना खान आणि दुसरे रॉबिन गोनेला.

Leave a Comment