मनाविरुद्ध बदली केली म्हणून पोलीस अधिकाऱ्याने 60 किमी धावत गाठले पोलीस ठाणे


इटावा – मनाविरुद्ध झालेल्या बदलीमुळे उत्तर प्रदेशच्या इटावा येथील नाराज झालेले पोलीस अधिकारी विजय प्रताप यांनी बदली झालेल्या पोलीस ठाण्यापर्यंत धावत जाण्याचा निर्णय घेतला. पण ते ४० किमी धावल्यानंतर बेशुद्ध पडले. ग्रामस्थांनी त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले. पोलीस लाइनमध्ये अधिकारी विजय प्रताप तैनात होते.


त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांची बदली शुक्रवारी बिठोली पोलीस ठाण्यात करण्यात आल्यानंतर बदलीच्या निषेधार्थ त्यांनी पोलीस ठाण्यात धावत जाण्याचे ठरवले. रस्त्यावर पळताना त्यांना पाहून पोलीस गुन्हेगाराच्या मागे धावत असल्याचे लोकांना वाटत होते. पण त्यांना लोकांनी याबाबत विचारले असता ते म्हणाले, निषेध करण्याचा हा आपला एक मार्ग आहे.

विजय प्रताप म्हणाले- यापूर्वीही बिठोली पोलीस ठाण्यात मी कार्यरत होतो. तेथील प्रभारीशी वाद झाल्यानंतर, पोलीस लाइनमध्ये मला पाठवण्यात आले. माझी माझ्या इच्छेविरुद्ध तिथेच बदली केल्यामुळे या मार्गाने मी निषेध केला आहे, असे विजय प्रताप यांनी नंतर सांगितले.

Leave a Comment