अक्षय-करिनाच्या आगामी गुड न्यूजचा ट्रेलर रिलीज


पोस्टरच्या माध्यमातून प्रेक्षकांची उत्कंठा वाढवल्यानंतर अक्षय कुमार आणि करिना कपूरच्या आगामी गुड न्यूजचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याकाळानंतर अक्षय आणि करीना कपूर खान ही जोडी रुपेरी पडद्यासाठी पुन्हा एकत्र आल्याने या दोघांच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरली आहे. अक्षय कुमार, करिना कपूरसोबतच या चित्रपटात किआरा अडवाणी, दिलजित दोसांज यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. ही कथा बाळासाठी प्रयत्न करणाऱ्या दोन जोडप्यांची असून आयव्हीएफ चाचणीदरम्यान समान नावांमुळे डॉक्टरांचा घोळ होतो आणि या घोळातून निर्माण झालेल्या गोंधळाची गोष्ट ‘गुड न्यूज’मध्ये दाखवण्यात येणार आहे.

अक्षय कुमार, करिना कपूर, किआरा अडवाणी, दिलजित दोसांज हे चारहीजण गुड न्यूज या विनोदी चित्रपटानिमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे. या वर्षांतला सर्वात मोठा गोंधळ असे वर्णन करत चित्रपटाच्या टीमने चित्रपटाविषयी उत्सुकता वाढवली होती. याचित्रपटात या चौघांव्यतिरिक्त तिस्का चोप्रा, युक्ता मुखी, गुलशन ग्रोव्हरयांसारखे कलाकारही पाहायला मिळणार आहेत.

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटातून राज मेहता दिग्दर्शक म्हणून डेब्यू करत आहे. हीरू जोहर, अरुणा भाटिया, करण जोहर, अपूर्वा मेहता आणि शशांक खेतानने या चित्रपटाची निर्मिती केली असून हा चित्रपट 27 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

Leave a Comment